रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक यांचे खारेपाटण येथे स्वागत

खारेपाटण तालुका होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार – रवींद्र फाटक यांचे आश्वासन

खारेपाटणच्या विकासाचा बॅकलॉक लवकरच भरून काढणार

खारेपाटण (प्रतिनिधी) : रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना संपर्कप्रमुख तथा आमदार रवींद्र फाटक यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वार असणाऱ्या खारेपाटण येथील शिवसेना पक्षकार्यालयाला अगत्याने भेट दिली. यावेळी त्यांचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून जोरदार स्वागत करण्यात आले. खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर आणि प्रमुख पदाधिकारी यांनी आमदार रवींद्र फाटक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पक्षकार्यालयात भेट देऊन फाटक यांनी उपस्थित ग्रामस्थांशी, स्थानिक पदाधिकारी यांच्याशी विकास कामांबाबत चर्चा करत संवाद साधला. यावेळी खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीच्या वतीने आमदार रवींद्र फाटक यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन खारेपाटण तालुका निर्माण करण्यात यावा, या प्रमुख मागणीचे ग्रमस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

उपस्थितांशी संवाद साधताना फाटक म्हणाले, खारेपाटणच्या विकासाचा बॅकलोक भरून काढू व खारेपाटण तालुका निर्मितीची गेल्या ४० वर्षापासूनची असलेली मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांच्या माध्यमातून पूर्ण करू, असे आश्वासन यावेळी आमदार रवींद्र फाटक यांनी ग्रामस्थांना दिले. तसेच खारेपाटण घोडेपाथर जेटी व काझी वाडी चव्हाटा ब्रिज कामाची माहिती घेत हा बंधारा/ब्रिजचा प्रश्न लवकरच मार्गी लावून लोकांची अडचण सोडविण्यासाठी कायम तत्पर राहू, असे देखील फाटक यांनी सांगितले. यावेळी खारेपाटण संभाजी नगर सर्व्हिस रोड, खारेपाटण घोडे पाथर संरक्षक भिंत, आणि काझी वाडी ते चव्हाटा ब्रीज कम बंधारा या कामांची माहिती घेत पाहणी करीत लवकरच सर्व कामे मार्गी लावण्यात येतील, असा शब्द फाटक यांनी दिला.

याप्रसंगी खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर, जिल्हाप्रमुख संजय आग्रे, ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक दीपक वेतकर, विधान सभा प्रमुख संदेश पटेल, उपतालुका प्रमुख मंगेश गुरव, ग्रा.प.सदस्य गुरूप्रसाद शिंदे, सुधाकर ढेकणे, अस्ताली पवार, चिन्मय शिंदे, सुहास राऊत, प्रणय गुरसाळे, सचिन शिंदे, खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!