फोंडाघाटच्या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये सादरीकरण !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : राधाकृष्ण मंदिरात सुरू असलेल्या, अखंड हरिनाम सप्ताहाच्या सातव्या दिवशीची सकाळ, जीवन शिक्षण विद्यामंदिर केंद्र शाळा नंबर १ च्या बालचमुनी आपल्या सांस्कृतिक, पारंपारिक आणि अध्यात्मिक कलागुणांनी गाजवली. विविध व्यक्तिरेखांचे, विविध पोशाख केलेली मुले- मुली,ज्यामध्ये सावित्रीबाई फुले पासून टिळकांपर्यंत, पुरोहितांपासून ते शिवरायांपर्यंत आणि शेतकऱ्यांपासून संत – महात्म्यांच्या व्यक्तिरेखा साकारलेल्या होत्या. प्रारंभी इशस्तवन आणि नंतर भजने ! आपल्या निरागस परंतु नैसर्गिक आवाजात मुला-मुलींनी भजन- गवळण- गजरा मधून “तुम्ही देव पाहिला का ? आणि बाजाराला विकण्या निघालीsss या पदांमधून उपस्थित यांची मने जिंकली. त्यानंतर स्तोत्र- पठणाची चढाओढ मंत्रमुग्ध करणारी होती. यांना मुख्या.सृष्टी गुरव, सहकारी शिक्षका रंजना पाटील, वेदांती नारकर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनीस, शालेय कर्मचारी वर्ग, शाळा व्यवस्थापन समिती,शिक्षक पालक संघ,माता पालक संघ यातील सर्व अध्यक्ष आणि सदस्य पालक वर्ग आणि ग्रामस्थ तसेच भावीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.