तनिष्का कांबळे (प्रथम), अभिजीत चोरगे (द्वितीय), कृतिका पारकर (तृतीय) ! बक्षीस वितरण उत्साहात संपन्न
फोंडाघाट (प्रतिनिधी) : अखंड हरिनाम सप्ताहाच्या सात दिवसा दरम्यान, हरिनाम सप्ताह वर आधारित सर्वांसाठी अभिनव रिल स्पर्धा, बालगोपाळ मंडळातर्फे आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेचे बक्षीस वितरण मंडळाच्या सदस्यांचे हस्ते, मंदिरामध्ये करण्यात आले. विजेत्यांना स्मृतीचिन्ह व रोख बक्षिसाने तर, सहभागी स्पर्धकांना राधाकृष्ण प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.
या अभिनव स्पर्धेत तनिष्का कांबळे- प्रथम, अभिजीत चोरगे- द्वितीय, ऋतिका पारकर-तृतीय तर सहभागाबद्दल अमित कदम, साक्षी मसूरकर, शुभम हळदिवे, पुंडलिक येंडे, अथर्व रेवडेकर, जयेश सावंत यांना गौरविण्यात आले. स्पर्धेचे आयोजन श्रीकांत पारकर व सिद्धेश पावस्कर यांनी तर परीक्षण अतुल कोरगावकर व विराज ढवण यांनी केले. या स्पर्धेबद्दल पंचक्रोशीमध्ये कुतुहल होते. मात्र स्पर्धकांच्या अखंड हरिनाम सप्ताह वरील रिल मुळे सर्वत्र कौतुक होत आहे.