तळेरे (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग व क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग अंतर्गत तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तळेरे च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा कासार्डे हायस्कूल, कासार्डेे येथे पार पडल्या.
यावेळी सतरा वर्षाखालील मुले/मुली या गटात अवधूत तळेकर १००मी.धावणे द्वितीय, प्रशिक कदम 200 मी.धावणे व लांब उडी तृतीय क्रमांक, प्रसन्न तळेकर 400 मी.धावणे प्रथम, अनुष्का टक्के 400 मी.धावणे द्वितीय, चैतन्या पवार 200 मी. धावणे तृतीय, साहिल पवार 800 मी.धावणे तृतीय, गणेश माने गोळा फेक प्रथम, प्रशिक कदम, अवधूत तळेकर,साहिल पवार, प्रसन्न तळेकर 4×100 मी.रिले प्रथम क्रमांक पटकावला. तसेच 19 वर्षाखालील मुले/मुली गटात तनश्री दुदवडकर 200 मी. धावणे द्वितीय, लक्षण नांदगावकर भालाफेक द्वितीय क्रमांक मिळवला. प्रशालेचे क्रीडा शिक्षक एन.बी.तडवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळा समिती अध्यक्ष अरविंद महाडिक, सर्व शाळा स.सदस्य, प्राचार्य अविनाश मांजरेकर, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद, आजी-माजी विद्यार्थी, पालक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.