उबाठा सेनेचे देवगड अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्ष इकबाल धोपावकर भाजपात

आमदार नितेश राणेंमुळे अल्पसंख्याक समाजाचा होऊ शकतो विकास – धोपावकर

देवगड (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेना उबाठा अल्पसंख्याक सेल देवगड तालुकाध्यक्ष इकबाल धोपावकर यांनी भाजपा मध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.आमदार नितेश राणे यांच्या कार्यप्रणालीने प्रभावित होऊन आणि देवगड तालुक्यातील अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी भाजपात प्रवेश केल्याचे धोपावकर म्हणाले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री.आरिफ बगदादी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.संदीप मेस्त्री,विजयदुर्ग सरपंच श्री.रियाज काझी,श्री. नासिर मुकादम, श्री. मुस्ताफ चौगुले आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!