पदपथावर कुटुंबासह राहणा-या बालकांसह केली दिवाळी साजरी
खारेपाटण (प्रतिनिधी) : सोबती सोशल फौंडेशन आणि जीवन आनंद संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दहिसर रेल्वे स्टेशन पश्चिम येथे दारिद्र्याच्या कारणाने कुटुंबासह पदपथावर राहणा-या वंचित बालकांसाठी संगम डे केअर सेंटर चालविण्यात येते.हे सेंटर चार वर्षांपुर्वी सुरू झाले तेव्हापासून सोबती सोशल फौंडेशनचे विश्वस्त कार्यकर्ते दरवर्षी नित्यनेमाने स्वतःच्या घरच्या दिवाळी आधी संगम सेंटर मधील बालकांसह दिवाळी साजरी करतात. दिवाळी निमित्ताने बालकांना नवीन कपडे आणि मिठाईचे वाटप करण्यात येते. यंदाही हा कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात व आनंदात संगम डे केअर सेंटरमधे संपन्न झाला.
सोबती सोशल फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद सावंत,सचिव -महेश बुरटे,खजिनदार – दिपक झाडराव, उपाध्यक्ष राजू कुळणकर, कार्यकर्ते प्रसाद शेजवलकर,मनोज धोत्रे, यशवंत साटम आदी प्रमुख पदाधिकारी व संगम सेंटरमधील सुनिता भंडारी,मिना पटेल,नम्रताताई कांचन पाटिल आदी मान्यवर उपस्थीत होते.