शिवसेना उबाठा चे उमेदवार संदेश पारकर आणि महाविकास आघाडीच्या कणकवली संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर याच्या संपर्क कार्यालयाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, माजी आमदार परशुराम उपरकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनत पिळणकर, युवासेना उपतालुकाप्रमुख प्रमुख उत्तम लोके, सुदाम तेली, राजू राठोड, सचिन सावंत, महिला जिल्हाप्रमुख निलम पालव, सी. आर. आदि उपस्थित होते.

यावेळी कार्यलयात संदेश पारकर यानी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, कणकवली विधानसभा मतदार संघात अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पैकी प्रकाश नारकर आणि विश्वनाथ कदम यांनी उमेदवारी मागे घेऊन महाविकास आघाडीला पाठिबा जाहीर केला याबद्दल विधानसभा मतदार संघाचे उमेदवार संदेश पारकर यांनी आभार मानले. याचे सर्व श्रेय राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर याना जात असल्याचे सांगितले.यावेळी ते कणकवली येथील सपर्क कार्यालयच्या उ‌द्घाटन प्रसंगी बोलत होते.

यावेळी उमेदवारी अर्ज मागे घेतलेले प्रकाश नारकर व विश्वनाथ कदम म्हणाले की, आपण महाविकास आघाडीच्या बाजूने राहील पाहिजे. सदेश पारकर आणि आम्ही यापूर्वी एकत्र काम करत होतो. त्यामुळे मताच विभाजन होऊ नये यासाठी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. २३ तारीखला मतपेटीच्या माध्यमातून या मतदारसंघात कशा प्रकारे या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकेल आणि याचे रूपातर विजयात होईल. यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे संदेश पारकर यानी कार्यकर्त्यांना संबोधित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!