कोल्हापूर (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्दयीपणे निर्घृण हत्या करण्यात आली. पवनचक्की खंडणी प्रकरणतील संशयित वाल्मिकी कराड हाच सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण व हत्येचा सूत्रधार आहे, हे संपूर्ण बीड जिल्ह्यातील जनतेला माहित आहे. त्यामुळे आरोपीना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच आरोपीना पाठीशी घालणाऱ्याला मंत्रिपदावरून काढून टाकाव, असा आक्रोश बीड जिल्ह्यातील जनतेने आणि मराठा समाजान मोर्चातून केला आहे. इतिहास काळापासून मराठा समाज हाच महाराष्ट्राच्या जडणघडणीतला तारणहार आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेल्या पुरोगामी शिकवणीचे अनुकरण करत बहुजन समाजात एकोपा ठेवत गुण्यागोविंदान राहण्याच काम आजतागायत मराठा समाजानं केल आहे. कितीही अन्याय झाला तरी वरचढ असूनसुद्धा राज्यात आणि संपूर्ण बहुजन समाजात एकीसाठी दरवेळी मराठ्यांनी नमत घेतल आहे. याचाच गैरफायदा घेत अलीकडच्या काळात काही माजलेले सत्ताधारी त्यांच्या त्यांच्या जातीच राजकारण करत मराठ्यांवर अन्याय करत आहेत. अशा राजकीय पाठबळामुळे बीड जिल्ह्यातील वंजारी समाज सातत्याने मराठ्यांवर अन्याय करत आहे. बीड जिल्ह्यात सुमारे 5 लाखाहून अधिक ऊस तोडणी कामगार असून यातील बहुतांश वंजारी समाजाचे आहेत. सदर कामगार रोजगारासाठी पश्चिम महाराष्ट्रात येतात. जातीच राजकारण करणाऱ्या स्वार्थी नेत्याला धडा शिकवण्यासाठी जशास तसे प्रमाणे आधुनिक गनिमीकावा करत मराठा समाजाने वंजारी समाजाला पश्चिम महाराष्ट्रात बंदी घातल्यास त्यांच्या आर्थिक नाकाबंदीची जबाबदारी मुंढे आणि शासन यांची राहील. याची गांभीर्याने दखल घेत शासनाने दोषींवर ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी छावा मराठा संघाचे जिल्हा अध्यक्ष श्री. राजू सावंत यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
देशमुख प्रकारणतील आरोपीना शिक्षा होईपर्यंत जिल्ह्यात वंजारी कामगारांना बंदी घाला – छावा मराठा संघटना











