आचरा (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक पळसंब शाळा नंबर १ ची शैक्षणिक सहल उद्या देवगड येथे जात आहे. त्याचं औचित्य साधून श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसंब यांच्या वतीने मुलांच्या खाऊ साठी रोख रक्कम ४००० रुपये शिक्षक वर्गाकडे सुपूर्त करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष उल्हास सावंत, सेक्रेटरी माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर, मंडळाचे आजीव सभासद गिरीधर पुजारे उपस्थित होते. मंडळाच्या वतीने सहलीला शुभेच्छा देऊन शैक्षणिक सहल यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. शिक्षक वर्गाने मंडळाचे आभार मानले.