वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्याच्या वतीने मत्सोद्योगमंत्री नितेश राणे यांचा जंगी नागरी सत्कार संपन्न झाला. या नागरी सत्कारावेळी माजी नगरसेवक संताजी अरविंद रावराणे यांनी माजी सभापती अरविंद रावराणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्री नितेश राणे यांना त्यांच्या प्रतिमेचे सुबक देखणे काष्ठशिल्प भेट देत मंत्री राणे यांचा हटके सत्कार केला. तसेच सोनाळी गावच्या वतीने शाल व श्रीफळ देउन मंत्री राणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोनाळी शक्तिकेंद्र प्रमुख प्रकाश शेलार, सोनाळी माजी सरपंच समाधान जाधव, तंटामुक्त अध्यक्ष सोनाळी सचिन तळेकर, सोनाळी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष रुपेश बोभाटे, मारुती पाटील, बाबू सुतार, शांतेश शेलार आदि उपस्थित होते.














