काळसे येथे मोफत नेत्रतपासणी शिबीर संपन्न

आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्त काळसे शाखेमार्फत आयोजन


चौके ( प्रतिनिधी ): कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस २६ मार्च रोजी साजरा होणार असून त्यानिमित्ताने आज दिनांक २४ मार्च रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) काळसे शाखा यांच्या वतीने काळसे येथे मोफत नेत्रतपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन काळसे सरपंच सौ. विशाखा काळसेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आले. यावेळी पेंडूर विभाग प्रमुख कमलाकर गावडे ,अण्णा गुराम , शाखाप्रमुख राजू परब , उमेश प्रभु , सुधीर प्रभु ग्रामपंचायत सदस्य पप्या राऊळ , मोनिका म्हापणकर, सुजाता परब , नेत्रतज्ज्ञ डॉ. भाग्यश्री धायतिडक , दाजी परब , अजित परब , सुनिल वालावलकर , शिवनंदन प्रभु, आणि ग्रामस्थ महिला व पुरुष उपस्थित होते. या शिबीराचा गावातील बहुसंख्य ग्रामस्थांनी लाभ घेतला.

error: Content is protected !!