खारेपाटण हायस्कूल येथे इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी यश कॉम्प्युटर अकॅडमी खारेपाटणच्या वतीने खारेपाटण येथील शेठ न.म. विद्यालय येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दहावी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असे दोन दिवसीय मार्गदर्शन शिबिर अकॅडमीचे संचालक मंगेश गुरव यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच प्रशालेत संपन्न झाले.

या मार्गदर्शन शिबिर वर्गाचे उद्घघाटन सिताई रिसॉर्ट वारगाव तालुका कणकवली चे मालक ओंकार गुरव यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. याप्रसंगी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक गुरुप्रसाद शिंदे, विजय देसाई, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंगेश ब्रह्मदंडे, खारेपाटण गाव तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुहास राऊत, लांजा सिनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्रीचव्हाण सर, खारेपाटण सिनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ.ए. डी. कांबळे , खारेपाटण हायस्कूलचे प्राचार्य संजय सानप,पर्यवेक्षक संतोष राऊत,आदी मान्यवर उपस्थित होते.

या मार्गदर्शन शिबिरासाठी उपस्थित असणारे फोंडा हायस्कूलचे गणित विषयाचे शिक्षक राठोड सर, रावराणे हायस्कूल वैभववाडी चे शिंदे सर, नरडवे हायस्कूलच्या शिक्षिका श्रीम परब मॅडम, विद्यामंदिर कणकवली चे शिक्षक ठाकूर सर या तज्ञ मार्गदर्शक शिक्षकांनी यावेळी दहावी च्या विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. यावेळी खारेपाटण सिनियर कॉलेज ने NAC नामांकनात ‘बी’ ग्रेड प्राप्त केल्याबद्दल प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे सर यांचा सत्कार यश कम्प्युटर अकॅडमी चे संचालक मंगेश गुरव यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक असणारे छान असे मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.तर सदर मार्गदर्शन शिबिराचा आपल्याला खूप चांगला लाभ झाला. याचा फायदा नक्कीच येणाऱ्या एसएससी बोर्ड परीक्षेत आम्हाला होईल अशा भावना विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

error: Content is protected !!