कुडाळ आगाराचे वेळापत्रक पुर्णपणे कोलमडले ; अतुल बंगे

कुडाळ ते कोचरा श्रीरामवाडी बस पुर्ववत सुरु करा

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ ते कोचरा श्रीरामवाडी बस पुर्ववत सुरु करा अन्यथा शिवसेनेच्यावतीने कोणत्याही क्षणी आंदोलन करु असा इशारा देत शिवसेनेचे अतुल बंगे यांनी कुडाळ एसटी आगाराच्या भोंगळ कारभारावर खडे सवाल उपस्थित केले आहेत. कुडाळ आगाराचे वेळापत्रक पुर्ण पणे कोलमडले असल्याने गावा गावातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु असल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. कुडाळ डेपो याची जबाबदारी घेईल का..? असा सवाल शिवसेनेचे अतुल बंगे यांनी आज केला. दरम्यान कुडाळ ते कोचरा श्रीरामवाडी एसटी बस गेले दोन दिवस आली नसल्याने आज कुडाळ आगाराच्या अधिका-यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी युवासेनेचे राजु गवंडे, नेरुर शिवसेना उपविभाग प्रमुख मंगेश बांदेकर, साळगाव शिवसेना विभागाचे संदीप कोरगावकर उपस्थित होते. निवेदन देत ही गंभीर बाब उघड केली. एस टी बसेस ओरोस आर टी ओ कड़े पासिंगसाठी उभ्या आहेत, चालक व वाहक बसुन आहेत, अधिकारी हतबल झालेले दिसून येत आहेत. एसटी गाड्या कुडाळ डेपोमध्ये उपलब्ध नसल्याने लांब पल्ल्याच्या व गावा गावात जाणा-या बसेस रद्द करण्यात आल्याची माहिती उपस्थित अधिका-यांनी दिली असल्याची माहिती बंगे यांनी दिली.
पासिंगच्या नावाखाली आर टी ओ कडे बसेस उभ्या करुन विद्यार्थी व प्रवाशांचे हाल कशासाठी ? असा प्रश्न श्री बंगे यांनी उपस्थित करून कुडाळ ते कोचरा श्रीरामवाडी बस गेले दोन दिवस आली नाही. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानास जबाबदार कोण? अशा प्रश्नांचा भडीमार करत येत्या दोन दिवसांत एसटी बसेस पुर्ववत सुरु करा अन्यथा शिवसेनेच्यावतीने कोणत्याही क्षणी आंदोलन करु असा इशारा बंगे यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!