नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज नांदगाव केंद्र शाळा नंबर 1 येथे भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी मुलांनी विविध कला गुण सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मुलांनी कला गुण सादर केल्यानंतर नारायण राणे मार्गदर्शन करताना म्हणाले की, मुलांचा आत्मविश्वास पाहिला खूप सुंदर, याही पुढे जात मुलांनी प्रगती करावी. व शिक्षक वृंदानी ज्ञानेश्वर ,छत्रपती शिवाजी महाराज ,लोकमान्य टिळक, नेहरू, महात्मा गांधी यांचे विचार आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करावेत. शाळा हे ज्ञानाचे मंदिर आहे. व ही मुलं देशाचे उद्या नागरिक आहेत. त्या प्रकारे शिक्षण दिले पाहिजे या वयातच मुलांना याची शिकवण द्याल, जे मार्गदर्शन कराल ते लवकरच आत्मसात केले जाते .असे सांगत मुलांनी सादर केलेल्या कलागुणांचे ही कौतुक केले.तर ढोलकी वाद्य करणारा ईशांत मारुती मोरये याचेही विशेष कौतुक केले. आज आपली सर्वांची भेट झाली मला आनंद झाल्याचे शेवटी राणे यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्या समवेत आम.नितेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, खरेदी विक्री संघ संचालक पंढरी वायंगणकर,उपसरपंच इरफान साटविलकर, मिलिंद मेस्त्री, डॉ मिलिंद कुलकर्णी, माजी पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, माजी सरपंच संजय पाटील, आफ्रोजा नावलेकर,निरज मोरये, हनुमंत वाळके, शिक्षक सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष नागेश मोरये, मुख्याध्यापक श्री सुहास सावंत, सर्व शिक्षक वृंद,पालक, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.