शासनाच्या योजनांचा लाभ घेणारे फोंडाघाट नंबर एक वर राहावे – कोकरे
फोंडाघाट मधील शेतकरी बांधवांनी शासनाच्या विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा – दिलीप पाटील
फोंडाघाट मध्ये ॲग्री स्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी वितरणासाठी शेतकरी मेळावा संपन्न !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट महसूल मंडळ- तलाठी ऑफिस मार्फत ग्रामपंचायत कार्यालय फोंडाघाट येथे, फोंडाघाट शेतकरी बंधू भगिनींनी साठी ॲग्रीस्टॅक योजने अंतर्गत, आपला ७/१२ उतारा आधार कार्ड शी लिंक करून फार्मर आयडी मिळवण्यासाठी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर मेळाव्याचे दिपप्रज्वलन तसेच शेतकरी बांधवांना फार्मर आयडी चे वाटप सरपंच संजना संजय आग्रे, तसेच नायब तहसीलदार कोकरे यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महसूल अधिकारी दिलीप पाटील, मंडळ अधिकारी मोंडे, तलाठी एस.बी. सावंत, ग्रामविकास अधिकारी जाधव, फोंडाघाट वि. सेवा सोसायटी चेअरमन राजन नानचे जेष्ठ शेतकरी प्रकाश सावंत तसेच फोंडाघाट मधील शेतकरी बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच फोंडाघाट मधील काॅमन सर्विस सेंटर चालक उपस्थित होते. यावेळी बोलताना सरपंच संजना आग्रे, नायब तहसीलदार कोकरे, दिलीप पाटील यांनी फोंडाघाट मधील शेतकरी बंधू भगिनींनी या शासनाच्या उपक्रमाचा जास्तीत लाभ घेऊन शासनाच्या पीएम किसान सन्मान, मुख्यमंत्री नमो किसान सन्मान योजना तसेच शासनाच्या विविध कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा आणि फोंडाघाट मधील सर्व सी. एस. सी. सेंटर चालकांनी उत्तम प्रकारे शेतकरी बांधवांना सेवा देऊन शासनाच्या उपक्रमाची जनतेमध्ये वाहवा मिळवावी जेणेकरून आपल्या सी. एस. सी. सेंटरमध्ये आणखीन शासनाच्या विविध योजना आपल्या सेंटर मार्फत जनतेला सेवा देण्यासाठी शासन प्रोत्साहन देईल. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.














