सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी समिल प्रभाकर जळवी यांची भंडारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दिनांक ०६ फेब्रुवारी २०२५ रोजी महासंघाचे अध्यक्ष हेमंत करंगुटकर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत समिल जवळी यांची निवड केली आहे. गेली अनेक वर्षें सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे तसेच कुडाळ तालुका भंडारी महासंघाचे समिल जळवी भंडारी समाजाचे तळमळीने आणि निस्वार्थी कार्यपद्धतीने काम करत होते.समिल जळवी यांचा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भंडारी समाज बांधवांचा संपर्क हा दांडगा आहे. त्यामुळे भंडारी समाजाला एकत्रित ठेवण्यातच्या दृष्टीकोनातून त्यांची भंडारी समाजाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी समिल जळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यावेळी महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हातील जिल्हा सदस्य आणि कार्यकारणी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. भंडारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष हेमंत करंगुटकर, पदाधिकारी रमण वायंगणकर, सरचिटणीस हेमंत सावंत, कुडाळ तालुका अध्यक्ष गजानन वेंगुर्लेकर, श्रीकांत वेंगुर्लेकर, मालवण तालुका अध्यक्ष रविंद्र तळशीलकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर, विकास वैद्य, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख समिल जळवी, राजु गवंडे, सुनिल नाईक, भरत आवळे, प्रियदर्शन कुडव, नामदेव साटेललकर, मनोहर पालयेकर, लक्ष्मीकांत मुंडये अन्य भंडारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.