पालकमंत्री नितेश राणे आमदार स्थानिक विकास फंडातून ओझरम बौद्धवाडी रस्त्यासाठी १२ लाख मंजुर

तळेरे (स्वप्नील तांबे) : ओझरम बौद्धवाडीकडे जाणारा सस्ता त्यावर कित्तेक वर्षव खाडिकर व डांबरीकरण लोकप्रतिनिधी व प्रशासनाने पूर्ण करून दिलेले नाही. यासाठी त्यांचे लक्ष वेधण्यासाठी ओझरम बौद्धजन मंडळ मुंबई मुलखी शाखा ओझरम आणि सावित्रीबाई फुले महिला मंडळ ओझरम यांचे संयुक्त विद्यमाने मंडळाचे सचिव सुरेश तांबे यांनी दिनांक १० फेब्रुवारी २०२५ रोजी आमरण उपोषण करण्याचे योजिले होते. परंतु कारवाई करण्यासाठी ग्रामपंचायत ओझरम सरपंच समृद्धी राणे यांनी दि ६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता चर्चेसाठी मंडळाला निमंत्रीत केले होते. त्यांचा मान राखण्यासाठी ग्रामस्थ उपस्थित राहिले परंतु तोडगा न निघाल्यामुळे शिष्ट मंडळाने पालकमंत्री नितेश राणे यांची ८ फेब्रुवारी रोजी कणकवली येथे त्यांच्या दौऱ्यावेळी भेट घेऊन १२ लाख मंजुर केले. त्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांचे ओझरम बौद्धजन मंडळ मुंबई मुलखी शाखा ओझरम आणि सावित्रीबाई फुले महिला मंडळ ओझरम यांनी मनापासून आभार व्यक्त केले. तसेंच सरपंच ओझरम यांनी कृती आराखड्यातील १० लाख मंजूर केले. तसेच सुरेश तांबे यांनी आरपीआय आठवले गटाचे कणकवली तालुका अध्यक्ष यांनी महोदयांची शिफारस घेतली. तसेच समाज कल्याणचे चिनमे साहेब यांच्याकडे समाज कल्याण फंडातून १० लाखांची मागणी केली. सर्व लोकप्रतिनिधी यांनी लेखी आश्वासन देऊन रस्ता मंजुरीसाठी सहकार्य केले यासाठी ओझरम बौद्धजन मंडळ मुंबई मुलखी शाखा ओझरम आणि सावित्रीबाई फुले महिला मंडळ ओझरम यांच्यातर्फे सर्वांचे आभार.

error: Content is protected !!