पो. नि. प्रवीण कोल्हे यांचे ग्रामस्थांना आवाहन
तिरवडे येथे ग्रामसंवाद कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
मसूरे (प्रतिनिधी) : ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासन यामध्ये चांगला संवाद व्हावा यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सायबर गुन्हे अलीकडच्या काळात वाढले आहेत. ग्रामस्थांनी सजग राहत फसवणूक होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी येथे केले. ग्रामपंचायत तिरवडे येथे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसंवाद कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
यावेळी सायबर गुन्हे, मोबाईल वापराबाबत ओटीपी, कसे गुन्हे घडतात आणि त्यापासून कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे याविषयी पो. नी. प्रवीण कोल्हे यांनी माहिती दिली. यावेळी तिरवडे गावच्या सरपंच सौ रेश्मा उमेश गावडे, उपसरपंच सुशील गावडे, ग्रामपंचायत सदस्य सुमित मेस्त्री, विशाखा गावडे, तिरवडे पोलिस पाटील संतोष जामसांडेकर, नांदोस,तळगाव, वराड पोलिस पाटील, कृषी सहाय्यक सौंगडे, शिक्षक ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील महिला बचत गटातील अध्यक्ष,सदस्य, ग्राम संघाचे पदाधिकारी, महिला, ग्रामस्थ ,ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते .सर्व मान्यवर व ग्रामस्थांचे आभार श्री जयंद्रथ परब यांनी मानले. तर सुत्रसंचालन जयंद्रथ परब यांनी केले
