लोरे नं.२ डोंगरेवाडी येथे श्री सत्यनारायण महापूजा संपन्न

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती

कणकवली (प्रतिनिधी) : लोरे नं.२ डोंगरेवाडी येथे प्रतीवर्षीप्रमाणे श्री सत्यनारायणाची महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी लोरे डोंगरेवाडी येथील सत्यनारायण महापुजेस उपस्थिती दर्शवली. डोंगरेवाडी ग्रामस्थांच्या वतीने युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांना सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दिव्या पाचकुडे, उपसरपंच रुपेश पाचकुडे, शामसुंदर भोवड, साई भोवड, प्रथमेश मांजलकर, तुषार मांडवकर, अमर मांडवकर, सत्यवान आग्रे, महेश सोगम, अविनाश दर्डे, सुरज झिमाळ, राजेश डोंगरे, सचिन डोंगरे, रविकांत मांडवकर, विनायक नेमन, प्रथमेश आग्रे, हर्षद आग्रे, संतोष आग्रे, रविकांत पाचकुडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!