ग्रामपंचायत लोरे नं १ येथे शिव जन्मोत्सव उत्साहात साजरा

फोंडाघाट (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत लोरे नं.1 च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त श्री गांगेश्वर मंदिर ते ग्रामपंचायत कार्यालय लोरे नं.१ पर्यंत भव्य शोभा यात्रा आयोजित करण्यात आली होती. सदर शोभा यात्रेस गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. तसेच शाळेतील मुलांनी विविध वेशभूषा करून उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. शिवजयंती उत्सवाचे निमित्ताने ग्रामपंचायत लोरे नं.1 येथे श्री सत्यनारायण महापूजा व हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हळदीकुंकू समारंभासाठी महिलांना वाण म्हणून पर्यावरण संवर्धन करण्यासाठी शेवगा रोप आणि प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी व पर्यावरण पूरक कापडी पिशव्या वाटप करण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम घेण्यात आला.

यावेळी सिंधुदुर्ग कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे, पंचायत समिती कणकवलीचे माजी सभापती मनोज रावराणे, सरपंच अजय रावराणे, उपसरपंच सूमन गुरव, ग्रामपंचायत सदस्य नरेश गुरव, सुप्रिया रावराणे, समीक्षा मोसमकर, सोनाक्षी खाडये, रसिका राणे, प्रमिला तेली, सतीश कासले, जयदास तेली, म.गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष प्रकाश रावराणे, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, सर्व शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, पोलीस पाटील, आरोग्य कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!