कोल्हापुरात खळबळ ! ‘मोदी हटाव’ चे लागले बॅनर

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : कोल्हापूर शहरात आज सकाळी ‘मोदी हटाव, देश बचाव’ या आशयाचे बॅनर लावले गेल्याचे समोर आले. सकाळी फिरायला गेलेल्या काही नागरिकांनी या बॅनरचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकल्याने हे बॅनर चर्चेचा विषय बनलेले आहे. बॅनर कोणी लावले याबाबत अद्याप माहिती मिळाली नसली तरी दिल्लीत ‘आप’ने लावलेल्या बॅनर सारखे दिसणारे हे बॅनर असल्याचे समजते.

देशात राष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या घडामोडी, अडाणी समूहाच्या कथित घोटाळ्यामुळे संसदेत सुरू असलेला गदारोळ, राहुल गांधी यांची खासदारकी तडकाफडकीने काढून घेतल्याचे प्रकरण ताजे असतानाच अशा आशयाचे बॅनर कोल्हापुरात लागल्याने खळबळ उडाली आहे.

error: Content is protected !!