कुंरगवणे – बेर्ले शाळांमधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप
खारेपाटण (प्रतिनिधी) : कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार व माजी खासदार नीलेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त कुरंगवणे – बेर्ले ग्रामपंचायतीचे सरपंच व कट्टर राणे समर्थक कार्यकर्ते पप्पू ब्रम्हदंडे यांच्या वतीने गावातील सर्व शाळांमधील शालेय विद्यार्थ्यांना नुकतेच खाऊ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला गावचे उपसरपंच बबलू पवार, भाजपचे कार्यकर्ते रवींद्र लाड, बूथ अध्यक्ष संजय लाड, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र लाड, सेवक जाधव सत्यवान सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शाळेचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

