२६ रोजी हास्यकल्लोळ तर २७,२८ रोजी राधाकृष्ण नृत्य रोंबाट स्पर्धेचे आयोजन….!
कणकवली (प्रतिनिधी) : शिमगोत्सवानिमित्त महापुरुष मित्रमंडळ, कणकवलीच्यावतीने झेंडा चौक येथील मांडावर २६ ते २८ मार्च या कालावधीत कै. सुरेश अनंत धडाम यांच्या स्मृतिनिमित्त हास्यकल्लोळ व मांडावरील राधाकृष्ण नृत्य रोंबाट स्पर्धेचे आयोजन केले आहे. २६ मार्च रात्री ९ वा. हास्य कल्लोळ स्पर्धा पार पडणार आहेत.या स्पर्धेकरिता अनुक्रमे १०,००० रु., ८,००० रु., ६००० रु. अशी बक्षीसे दिली जाणार आहेत. तर २७ ते २८ रोजी रात्री ९ वा. राधाकृष्ण रोबाट स्पर्धा पार पडणार आहेत. या स्पर्धेकरिता अनुक्रमे २०,००० रु., १५,००० रु. ११,००० रु. अशी बक्षीस ठेवण्यात आली आहेत. याशिवाय उत्तेजनार्थ बक्षीसे देखील दिली जाणार आहेत.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी पद्युम मुंज (९५४५१२१६१६), चेतन अंधारी (९४२२०७४१४३) प्रज्वल वर्दम (७५८८८९९६००) यांच्याकडे संपर्क करून नावनोंदणी करावी. दरम्यान, मांडावरील राधाकृष्ण नृत्य रोंबाट स्पर्धेत कणकवलीकारांना पौराणिक चलचित्र देखावे, पारंपरिक कलाविष्कार, मांडावरील खेळ, देवदेवांची व प्राण्यांची वेशभूषा पाहता येणार आहेत.तसेच हास्यकल्लोळ स्पर्धेत विविध विषयांवर तयार केलेली स्क्रीप्ट विनोदी नाटक पाहता येणार आहे. या मनोरंजनात्मक स्पर्धां पाहण्यासाठी रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने केले आहे.

