जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी ३० जून पर्यंत मुदतवाढ

ओरोस (प्रतिनिधी) : १ एप्रिल २०१९ पूर्वी रजिस्ट्रेशन झालेल्या सर्व वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र याचा आढावा घेतल्यानंतर HSRP नंबर प्लेट बसविण्याचे काम अत्यंत कमी झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आले.त्यामुळे ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून तत्पूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जुन्या वाहन धारकांनी HSRP नंबर प्लेट आपल्या वाहनांना बसवून घ्याव्यात असे आवाहन सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन अधिकारी काळे यांनी केले आहे.

error: Content is protected !!