‘कोकण प्रॉपर्टीज २०२५’ चे छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर, मुंबई येथे आयोजन

मुंबई (प्रतिनिधी) : प्रॉपर्टी शोधणाऱ्यांसाठी एकाच छताखाली विविध पर्याय उपलब्ध करुन देणे आणि सर्व बांधकाम व्यावसायिक, विकासक, आर्किटेक्ट, बँका आदी सर्वांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी क्रेडाई सिंधुदुर्ग च्यावतीने ४, ५ व ६ एप्रिल २०२५ या तीन दिवसांच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर, मुंबई येथे “कोकण प्रॉपर्टीज २०२५” च्या प्रर्दशनाचे आयोजन करण्यात आले आहे, या प्रर्दशनात सर्व विकासकांनी आणि ग्राहकांना सहभागी होण्याचे आवाहन पत्रकार परिषदेत क्रेडाई सिंधुदुर्ग चे पदाधिकारी गजानन कांदळगावकर, अभिजीत जैतापकर, अनिल साखळकर यांनी केले. कोकण पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच प्रवास करण्यासाठी सोपा, आरामदायी, राहणीमान, चांगल्या पायाभुत सुविधा, आधुनिक सुखसोयी व उत्कृष्ट कनेक्टीविटी असल्यामुळे येत्या काळात कोकण स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक आदर्श ठिकाण म्हणून नावारुपास येत आहे. मुंबईमध्ये कोकणातले लोक मोठ्या प्रमाणात आहेत; त्यांना स्थावर मालमत्तेविषयी माहिती व्हावी आणि बांधकाम व्यावसायिकांना त्यांच्यापर्यंत पोहचता यावे, यासाठी ४, ५ व ६ एप्रिल २०२५ या कालावधीत मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर, मुंबई येथे कोकण प्रॉपर्टीज २०२५ चे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. सकाळी १० ते रात्रौ ८ वाजेपर्यंत प्रदर्शन खुले राहणार आहे. या प्रदर्शनामध्ये एकूण ४५ विकासक सहभागी होणार आहेत. इच्छुकांनी क्रेडाई सिंधुदुर्ग कडे संपर्क साधावा.

error: Content is protected !!