प्राथ.शिक्षक समिती मालवणने राबविलेले उपक्रम कौतुकास्पद ; राजेंद्र पराडकर

चौके (प्रतिनिधी) : आहेत महाराष्ट्र राज्य प्राथ शिक्षक समिती शाखा मालवण यांचा वार्षिक गुणगौरव, शिक्षक सन्मान,दत्तक विद्यार्थी व आनंदमेळा कार्यक्रम आचरा येथे नुकताचतालुकाध्यक्ष सुयोग धामापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी केले. यावेळी व्यासपिठावर जेष्ठ मार्गदर्शक भाई चव्हाण, शिक्षक नेते नितिन कदम, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे, जिल्हा महिला अध्यक्षा निकिता ठाकूर,सचिव वैभवी कसालकर, मालवण शिक्षक नेते मंगेश कांबळी, संचालक राजेंद्रप्रसाद गाड, तालुका सचिव जीवन हजारे,प्रवक्ते नवनाथ भोळे, कार्याध्यक्ष रुपेश गरुड, उपाध्यक्ष महादेव असरोंडकर, मालवण तालुका महिला अध्यक्षा नेहा तांबे, सचिव भाग्यश्री वाडकर, कणकवली तालुका शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडिस, विनायक जाधव, सचिव महेंद्र पवार, महिला तालुका अध्यक्षा मोरे, माजी सचिव राजेंद्र कडूलकर,सरमळकर, मार्गदर्शक सुगंध तांबे, देवू जंगले, श्रीकृष्ण सावंत, अरुण गोसावी, उन्नती कराळे, सुगंधा गुरव,राजन जोशी, विनोद कदम, दत्तक विद्यार्थी, शिष्यवृती सराव परिक्षेतील यशस्वी विद्यार्थी, सेवानिवृत्त शिक्षक, पुरस्कार प्राप्त शिक्षक, बहूसंख्य पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तातू कुबल यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार नवनाथ भोळे यांनी मानले, दुपार नंतर शिक्षकांच्या कला गुणांना वाव देणारा सांस्कृतिक कार्यक्रम आनंदमेळा घेण्यात आला या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ऋतावरी वळंजू व तेंडोलकर मॅडम यांनी केले.

error: Content is protected !!