खारेपाटण हायस्कूल येथे दि.१७ एप्रिल २०२५ रोजी महसूल शिबिराचे आयोजन

विद्यार्थ्यांना मिळणार एकाच ठिकाणी विविध शैक्षणिक दाखले

खारेपाटण (प्रतिनिधी) : शेठ न.म. विद्यालय खारेपाटण व जुनियर कॉलेज खारेपाटण आणि तहसीलदार कार्यालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार दि.१७ एप्रिल २०२५ रोजी स.ठीक ८.०० ते दु.२.००. या वेळेत विद्यार्थ्यांना लागणारे विविध शैक्षणिक व प्रशासकीय दाखले लवकर मिळावे या उद्देशाने विशेष शिबिराचे आयोजन खारेपाटण हायस्कूल येथे करण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचे शैक्षणिक दाखले एकाच ठिकाणी काढून मिळणार असल्याची माहिती खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सानप यांनी दिली.

या महुसुल शिबिर कार्यक्रमाला कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, खारेपाटण मंडल अधिकारी सरिता बावलेकर,खारेपाटण ग्राम महसूल अधिकारी प्रवीण लुडबे खारेपाटण ग्रामविकास अधिकारी जी सी वेंगुर्लेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उल्या शिबिराला प्रारंभ होणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षी मुलांना विविध दाखल्यांची आवश्यकता भासते आणि आयत्यावेळी अनेक कागदपत्रे जमवणे त्याकरिता तालुक्याच्या ठिकाणी जाऊन ते सगळे कामकाज पूर्ण करणे सर्वच पालकांना शक्य होत नाही. त्यामुळे पालकांना होणारा त्रास वाचावा यासाठी खास महसूली शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराला येताना सर्व पालकांनी आवश्यक ती कागदपत्रे घेऊन शाळेत यावे असे आवाहन शेठ न.म. विद्यालय आणि जुनियर कॉलेज खारेपाटणचे प्राचार्य संजय सानप यांनी केले.तर कणकवली तालुक्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना या शिबिराचा लाभ घेता येणार आहे. तसेच जे विद्यार्थी शाळा सोडून.सद्या घरी आहेत आशा माजी विद्यार्थ्यांना देखील या प्रशासकीय दाखल्यांच्या लाभ घेता येणार आहे.तरी या संधीचा फायदा जास्तीत जास्त पालक व विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन खारेपाटण मंडल अधिकारी सरिता बावलेकर यांनी महसूल प्रशासनाच्या वतीने केले आहे.

error: Content is protected !!