खारेपाटण पंचशील नगर येथे डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

“महापुरुषांचे विचार त्यांना जीवंत ठेवत असतात ” – धम्मचारी जिनचित्त

खारेपाटण (प्रतिनिधी) : भगवान बुद्धांच्या सिद्धांत नुसार या पृथ्वी तलवार ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यु देखील ठरलेला आहे.परंतु महापुरुष देखील मरण पावतात ही बाब सत्य असली तरी महापुरुषांचे विचार त्यांना समाजात कायमस्वरूपी जिवंत ठेवत असतात असे भावपूर्ण उदगार धम्मचारी – जिनचित्त यांनी खारेपाटण पंचशील नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती कार्यक्रमात मार्गदर्शन करताना काढले.

पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने पंचशील नगर खारेपाटण येथील बुद्धविहार येथे आयोजित करण्यात आलेल्या या जयंती कार्यक्रमाला खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर,एम आय डी सी मुंबई कार्यकारी अभियंता सचिन पाटणकर,खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश गुरव, केळवली जि.प.शाळेचे शिक्षक संदीप जोगदंड,रत्नागिरी न.प. शाळेचे मुख्यध्यापक प्रकाश पाटणकर,बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या संघटनेचे सचिव सचिन कोर्लेकर,सहसचिव सागर पोमेडकर, पंचशील विकास मंडळाचे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर, उपाध्यक्ष जितेंद्र कदम, खजिनदार संदीप पाटणकर, संघमित्रा महिला मंडळाच्या अध्यक्ष आकांशा पाटणकर मुंबई मंडळाचे कार्यकर्ते बबलू पाटणकर,आरोग्य सेवक संतोष जुवाटकर,आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर पाटणकर यांचे शुभहस्ते पंचशील ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.यानंतर खारेपाटण पंचशील नगर येथील डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री प्रकाश हेटम यांच्या सौजन्याने देण्यात आलेल्या भारतीय संविधान पुस्तकाची १ प्रत खारेपाटण महिला सरपंच प्राची ईसवलकर याना पंचशील विकास मंडळाच्या वतीने सन्मानपूर्वक धम्मचारी जिनचित्त यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना धम्मचारी जिनचित्त म्हणाले आपल्या समजाचा जो काही विकास झाला आहे तो केवळ बाबसाहेबांच्या अपार मेहणतीमुळे त्यामुळे बाबासाहेबांचे सम्यक विचार घराघरात पोहचवून त्यांना अनंत चिरकाल जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.यावेळी सरपंच प्राची ईसवलकर,सचिन कोर्लेकर, यांनी शुभेछा दिल्या. तर या जयंती उस्तव निमित्त घेण्यात आलेल्या शालेय विद्यार्थी निबंध स्पर्धेत सांची संतोष पाटणकर (प्रथम), सुकन्या दिनेश पाटणकर (द्वितीय), मनस्वी संतोष जुवाटकर (तृतीय), सुप्रबुद्ध संदेश पाटणकर (चतुर्थ) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.त्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. तसेच आयपीएलच्या धर्तीवर पंचशील नगर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत ललित पाटणकर (भीम रायडर संघ ), भूषण गोवळकर (भीम आर्मी संघ), श्रवण पाटणकर (भीम वॉरियर्स संघ), प्रथमेश कदम (भीमशाही संघ ) अनुक्रमे विजेता संघाना संदीप पाटणकर यांचे शुभहस्ते विजयी चषक देऊन गौरविण्यात आले.

तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शिवसेना कार्यकर्ते महेश कोळसुलकर, खारेपाटण पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार चंद्रकांत माने,वन विभाग खारेपाटण तपासणी नाक्याचे कर्मचारी कांबळे,जय हनुमान मित्र मंडळाचे कार्यकर्ते नाना कोळसुलकर व त्यांचे सहकारी, तसेच बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण चे अध्यक्ष चंद्रकांत कांबळे, माजी अध्यक्ष मोहन पगारे, सम्यक नगर येथील समजा बांधव व वारगाव येथील समाज बांधव युवा कार्यर्कत्यांनी खारेपाटण बुद्ध विहाराला भेट देऊन शुभेछा दिल्या. यावेळी स्थानिक मुलांचे विविध फानिगेम कार्यक्रम घेण्यात आले होते.त्यानंतर रात्री संघमित्रा महिला मंडळाच्या वतीने भीम जयंती जल्लोष २०२५ सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.याला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.तर या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री संतोष पाटणकर यांनी केले.

error: Content is protected !!