खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध पखवाज वादक तथा सिंधुदुर्ग प्रथम पखवाज अलंकार महेश विठ्ठल सावंत मूळ गाव आंदुर्ले, कुडाळ यांचा नुकताच शासन बातम्या जिल्हास्तरीय कलगौरव पुरस्काराने महाराष्ट्र भूषण पखवाज वादक तालमणी प्रताप पाटील यांच्या हस्ते सत्कार करून पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई येथे संपन्न झालेल्या या सोहळ्यास पुरस्कार समिती अध्यक्ष निलेश यशवंत अनभवणे, निरीक्षण समिती अध्यक्ष रामनाथ दत्तू कोळी तसेच प्रतिनिधी वामन कोळी उपस्थित होते. तर या पुरस्काराचे श्रेय आपले गुरुवर्य डॉ. दादा परब, भजनसम्राट बुवा भालचंद्र केळूसकर, आपले कुटुंबीय, ग्रामस्थ आणि मित्रपरिवार यांना जाते असे पुरस्कार प्राप्त पखवाज वादक महेश सावंत यांनी यावेळी सांगितले.
शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्य,अध्यक्ष राजाराम शेलार यांच्या नेतृत्वात, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी पखवाज अलंकार महेश विठ्ठल सावंत यांची नियुक्ती महाराष्ट्र कला भूषण तालमणी प्रताप पाटील यांच्या हस्ते पत्र प्रदान करून निवड करण्यात आली आहे, या प्रतिष्ठान मार्फत संगीत, गायक, वादक, कला, क्रीडा, सर्वसामान्य कलाकार यांना संघटित करून भविष्यात कलाकाराला आपली कला सादर करायला हक्काची अनेक व्यासपीठ निर्माण करणे, शासन दरबारी कलेची दखल योग्य रित्या करून घेणे, शासनाकडून मिळणारे लाभ मिळवून देणे आणि आपली कला या डिजिटल युगात सुद्धा चांगल्या प्रकारे प्रगत ठेवणे आणि भविष्यात सुद्धा ती चांगल्या प्रकारे ती कशी टिकून राहील याकडे विशेष लक्ष देणे, अशा अनेक बाबी या प्रतिष्ठानची उद्दिष्ट व ध्येय असतील. यासाठी तालुका निहाय अध्यक्ष सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे.
याचा लाभ समस्त संगीत गायक वादक, सर्वसामान्य कलाकार या सर्वाना नक्कीच होईल असे यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष महेश सावंत यांनी बोलून दाखवले आहे. तसेच याबद्दल महेश सावंत यांनी आपले गुरुवर्य डॉ. दादा परब, भजनसम्राट बुवा भालचंद्र केळूसकर तसेच प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाराम शेलार बुवा समस्त प्रतिष्ठान परिवारचे आभार मानले.

