वैश्य समाज पतसंस्थेला 2022-23 आर्थिक वर्षात तब्बल 1 कोटी 65 लाखांचा निव्वळ नफा

फोंडाघाट (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित पतसंस्था सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित फोंडाघाट या संस्थेस सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये निव्वळ नफा 1 कोटी 65 लाख इतका प्राप्त झाला आहे.

सदर पतसंस्थेची निव्वळ नफ्यामध्ये झालेली वाढ ही संस्थेचा आलेख वाढविणारी बाब आहे. संस्थेकडे भागभांडवल 2 कोटी 40 लाख एकूण ठेवी रु 91 कोटी 84 लाख असून एकूण निधि रु 7 कोटी 75 लाख कर्ज रूपी रक्कम रु 69 कोटी 92 लाख व संस्थेची गुंतवणूक रक्कम रु 33 कोटी 63 लाख इतकी आहे. सन 2022-23 मध्ये संस्थेच्या वसूल भागभांडवल 69.85% निधि मध्ये 26.15 % ठेवी मध्ये 23.59 %, कर्जामध्ये 39.62% व गुंतवणुकीमध्ये 12.19% इतकी वाढ झाली आहे संस्थेस 2022-23 एकूण ढोबळ नफा 3 कोटी 10 लाख इतका झाला असून आवश्यकत त्या तरतुदी करून रु 1 कोटी 65 लाख इतका निव्वळ नफा झाला आहे. गती वर्षाच्या तुलनेमध्ये नफ्यामध्ये 16.12% इतकी वाढ झाली असून संस्थेने 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये उतुंग भरारी घेतली आहे.

सध्याच्या आधुनिक युगात वैश्य समाज पतसंस्था देखील मागे नाही. संस्थेचा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा एक संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरतो. आधुनिक तंत्रज्ञानामध्ये संस्थेमध्ये RTGS / NEFT, MOBILE APP, IMPS. क्यू आर कोड इंटरनेट बेकिंग एस एम एस अलर्ट ENACH ई. सेवांचा समावेश आहे. संस्थेने सन 2020-21 या काळात संस्थेचे मोबाइल अॅप ( Sindhudurg zilla ) देखील कार्यरत केलेले आहे. सदर अॅपचा वापर ग्राहक घर बसल्या देखील करू शकतात.

संस्थेचा SLR सन 2022-23 मध्ये 28.45% तर CRR 1.97% आणि CRAR 12.65% इतका राखला असून संस्थेची आर्थिक वाढ नावजण्याजोगी आहे.

संस्थेची दिवसेंदिवस वाढत चाललेली प्रगती ही सभासद ग्राहक कर्मचारी वर्ग व अल्पबचत प्रतिनिधी आणि संचालक मंडळ यांच्या सहयोगानेच झाली आहे असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन श्री दिलीप रा. पारकर व मुख्यकार्यकारी अधिकारी श्री ईश्वरदास शा. पावसकर यांनी केले आहे.

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!