वैभववाडी (प्रतिनिधी) : अरुळे येथील श्री विठ्ठल रखुमाई प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा शुक्रवार दिनांक 9 मे 2025 रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होत आहे.
यानिमित्त सकाळी नऊ वाजता पीठ देवता पूजा व होमहवन सकाळी साडेदहा वाजता शिखर कलश प्रतिष्ठापना सकाळी 11 वाजता मूर्ती प्राणप्रतिष्ठा अभिषेक महापूजा दुपारी एक ते तीन महाआरती व महाप्रसाद सायंकाळी चार वाजता हळदीकुंकू तर सायंकाळी सात ते आठ या वेळेत ह भ प महादेव दार्वेकर हे हरिपाठ सादर करणार आहेत तसेच सायंकाळी आठ ते दहा या वेळेत ह भ प सौ सुप्रियाताई साठे यांचे सुश्राव्य किर्तन आयोजित करण्यात आले आहे तसेच रात्र रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ 40 ते वारकरी भजन काकड आरती आदी कार्यक्रम होणार आहेत या कार्यक्रमाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा असे आव्हान विठ्ठल रखुमाई देव कमिटी अरुळे करपेवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे











