श्री देव गवळदेव मित्रमंडळ कुमामे-नागिंदेवाडी येथे श्री सत्यनारायण महापूजा व धार्मिक कार्यक्रमांचे आयाेजन

मालवण (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुमामे-नागिंदेवाडी येथील श्री देव गवळदेव मित्रमंडळाच्यावतीने रविवार 11 मे राेजी श्री सत्यनारायण महापूजा आयाेजित करण्यात आली आहे.त्यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे.

सकाळी ८ वा. विधीयुक्त अभिषेक (गणेश पुजन), सकाळी ९ ते १२ वा. श्री सत्यनारायण महापूजा, आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद,सायं. ४ ते ६ वा. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, सायं. ७ ते ८ वा. सुस्वर भजन,त्यानंतर रात्रौ ९.३० वा.संचालक सागर गवाणकर प्रस्तुत,ओम भवानी दशावतार नाटयमंडळ
राठीवडे,ता.मालवण, जि.सिंधुदुर्गकलाकार संच २०२४-२५ यांचा कुणकेश्वर स्थापना हा महान पौराणिक दशावतार नाट्य प्रयोग संपन्न हाेणार आहे.

सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन गवळदेव मित्रमंडळ कुमामे-नागिंदेवाडी यांनी केले आहे.

error: Content is protected !!