वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ वैभववाडी यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व संस्कृतीक भवनाचा १० वा वर्धापन दिन सोहळा १० मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. तसेच वर्धापन दिनाचे औचित्य साधून दिनांक १३ मे रोजी सायंकाळी जागर समतेचा एक संगीतमय आंबेडकरी शाहिरी जलसा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दिनांक १० मे रोजी सकाळी ११ वाजता पूजापाठ, सकाळी ११. ३० वा. प्रास्ताविक, स्वागत, व सत्कार. दुपारी १२ वा. जाहीर व्यख्यान कार्यकर्ता मार्गदर्शन, व समारोप असे कार्यक्रम होणार आहेत.
तसेच दिनांक १३ मे रोजी सायंकाळी ४ वाजता वर्धापन दिनानिमित्त विशेष एल्गार कला मंच यांच्या सौजन्याने, जागर समतेचा, एक संगीतमय आंबेडकरी शाहिरी जलसा हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात महात्मा फुले चित्रपटातील कलाकार सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रयोजक अनंत भगवान कांबळे, नीलम कांबळे, ऍड रश्मी कांबळे हे असून या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे. असे आवाहन वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ व माता रमाई महिला मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे..











