नाधवडे येथे उभ्या एस टी बसला डंपरची धडक ; दोन प्रवाशी किरकोळ जखमी

वैभववाडी (प्रतिनिधी) : तळेरे वैभववाडी राष्ट्रीय महामार्गावर नाधवडे कांबळे हॉटेल येथे बस थांब्यावर उभ्या असलेल्या एस टी बसला डंपरने मागून धडक दिली. या अपघातात दोन प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. तर एस. टी बसचे नुकसान झाले आहे. हा अपघात गुरुवारी दुपारी ३. १५ वा सुमारास घडला. अपघाताची नोंद वैभववाडी पोलीस ठाणेत करण्यात आली आहे.   विजयदुर्ग आगाराची विजयदुर्ग ते वैभववाडी ही बस घेऊन बस चालक एस एस खरबे व वाहक आ व्ही  सारंग हे वैभववाडीच्या दिशेने येत होते. बसमधून एकूण नऊ प्रवासी प्रवास करीत होते. दरम्यान नाधवडे कांबळे हॉटेल येथे बस थांब्यावर प्रवाशांना उतरण्यासाठी बस थांबली असताना तरेळेहुन वैभववाडीच्या दिशेने डंपर चालक राजपती हा आपल्या ताब्यातील डंपर घेऊन येत होता.त्याने बस थांब्यावर उभ्या असलेल्या बसला जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील प्रवाशी अनुराधा चंद्रकांत काडगे वय ६५ चंद्रकांत लक्ष्मण गाडगे व ६९ हे दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले.तर एस टी बसच्या मागच्या भागाचे तसेच बसच्या दर्शनी भागाची काच डंपरच्या जोरदार धडकेत फुटली आहे. अपघाताची नोंद वैभववाडी पोलीस ठाणेत करण्यात आली आहे. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यंत सुरु होती.

error: Content is protected !!