वैभववाडी तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात गुरुवारी सकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांची एकच तारांबळ उडाली. गुरुवारी अनेक ठिकाणी लग्न सोहळे होते. या पावसाने लग्नात या पावसामुळे व्यत्यय आला.तर अंतिम टप्यात असलेल्या आंबा, काजू पिकाला ही फटका बसला आहे.

तालुक्यात गेले काही दिवस उष्णतेत कमालीची वाढ झाली होती. मात्र गेले दोन दिवस काहीसे ढगाळ वातावरण होते. सकाळी वादळीवाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपून काढले. तालुक्यातील कुसर, कुंभवडे, करूळ, नावळे, खांबाळे सह अन्य गावात पावसाने हजेरी लावली.

error: Content is protected !!