ज्येष्ठ अभिनेत्री अक्षता कांबळी यांच्या हस्ते ज्येष्ठ नाट्यकर्मी टेलिव्हिजन निर्माता संतोष काणेकर यांचा सत्कार
कणकवली (प्रतिनिधी) : करंजे नारकर वाडी येथील श्री ब्राम्हण देव मंदिरचा उत्सवानिमित्त ह्यावर्षी वाडीतील ज्येष्ठ नाट्यकर्मी करंजे गावचे सुपुत्र लेखक, दिग्दर्शक, निर्माता असलेले संतोष काणेकर यांचा अभिनेत्री अक्षता कांबळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ महिला आणि पुरुष यांचा ही सत्कार करण्यात आला. यावेळी कांबळी यांनी आपल्या मालवणी भाषेत आपले कलाक्षेत्रातील अनुभव सांगत भरभरून शुभेच्छा दिल्या. नारकरवाडी ग्रामस्थ मंडळचे अध्यक्ष अजित काणेकर, उपाध्यक्ष प्रवीण बोभाटे, सचिव लक्ष्मण नारकर, कार्याध्यक्ष अजित बोभाटे यांनी अक्षता कांबळी यांनी वेळ देत उपस्थित राहिल्या बद्दल मंडळाच्या वतीने आभार मानले.













