पहाटेच्या वादळात एमएसईबीला बसला होता फटका
कणकवली (प्रतिनिधी) : आज सकाळी पाच वाजता झालेल्या वादळाचा एमएसईबीला मोठा फटका बसला आहे. नांदगाव येथे उंबरठ हद्दीत असणारे एमएसईबीचे पाच पोल वादळात तुटून पडले होते. त्यामुळे नांदगाव पंचक्रोशीमध्ये बत्ती गुल झाली होती. लाईट गेल्याने नांदगाव पंचक्रोशीतील नागरिकांचीदेखील तारांबळ उडाली होती. सदर घटनेची माहिती मिळताच एमएसईबी चे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पोल पूर्ववत करून विद्युतप्रवाह सुरु करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते. शेवटी ६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर सकाळी ११ वाजता विद्युतव्यवस्था पूर्ववत करण्यात एमएसबीच्या कर्मचाऱ्यांना यश मिळाले आहे. विद्युतप्रवाह सुरळीत सुरु झाल्याने नागरिकांनी एमएसबीच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.












