देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्याला सोमवारी पहाटे ४ वा. च्या सुमारास वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाने झोडपून काढले. या वादळी वाऱ्यांचा फटका सांडवे गावाला बसला. तेथील एका घराच्या छप्पराचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
सोमवारी पहाटे ४ वा. च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे सांडवे येथील अजित चंद्रकांत वायंगणकर, सुशिला शशिकांत वायंगणकर, सूर्यकांत अर्जुन वायंगणकर यांच्या सामाईक मालकीच्या घराचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यांमुळे त्यांच्या घराचे छप्पराचे नुकसान झाले आहे. सोमवारी सकाळी ८ वा. पर्यंत मागील २४ तासांत २० मि. मी. पावसाची नोंद झाली असून तालुक्यात एकूण १२५१ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
















