पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळा बेळणे खुर्द येथे फळ वाटप

बेळणे खुर्द सरपंच अविनाश राजाराम गिरकर यांच्या माध्यमातून फळ वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बेळणे खुर्द सरपंच अविनाश राजाराम गिरकर यांच्या माध्यमातून शाळा बेळणे खुर्द येथे फळ वाटप करण्यात आले. या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. यावेळी बेळणे सरपंच अविनाश गिरकर, उपसरपंच पंढरीनाथ चाळके, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र चाळके, सिद्धार्थ तांबे, वनिता मोरजकर तसेच तंटामुक्ती अध्यक्ष सुनील तांबे आणि ग्रामस्थ भरत चाळके तसेच मुख्याध्यापिका सामंत, अंगणवाडी सेविका, शिक्षक वर्ग उपस्थित होते.

error: Content is protected !!