पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून विजयदुर्ग डेपो ला नविन 5 एसटी बस

भाजपा तालुकाध्यक्ष बंड्या नारकर यांच्या हस्ते लोकार्पण

देवगड (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून विजयदुर्ग एसटी डेपोसाठी बीएस 6 मॉडेलच्या नवीन 5 एसटी बस उपलब्ध झाल्या असून त्याचे लोकार्पण पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवशी भाजपा पडेल मंडल अध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी डॉ.अमोल तेली, रवी पाळेकर, उत्तम बिर्जे, भूषण पोकळे (पडेल सरपंच), रियाज काझी (विजयदुर्ग सरपंच), महेश बिडये, प्रसाद देवधर, निलेश मणचेकर, महेश चव्हाण, ग्रेसिस फर्नांडिस, संजना आळवे (महिला मोर्चा पडेल मंडळ, अध्यक्षा), शुभा कदम (ग्रा. पं. सदस्या), प्रतिक्षा मिठबाकर (ग्रा. पं. सदस्या), पूर्वा लोंबर (ग्रा. पं. सदस्या), गीता लळीत, विवेक जमाले (आगार व्यवस्थापक, विजयदुर्ग), सचिन डोंगरे (स्थानक प्रमुख- विजयदुर्ग, ए. डी. वारे (ग्रामपंचायत अधिकारी, विजयदुर्ग), दर्शन डोंगरे, दिपक मिठबवाकर, अमित दत्ताराम डोंगरे, योगेश डोंगरे, सर्व विजयदुर्ग आगारातील सर्व कर्मचारी वर्ग, चालक वाहक, ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भाजपा चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!