कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे मत्स्योद्योग, बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांची प्राणजीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष, समाजभूषण पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर यांनी वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवशी ओम गणेश बंगल्यावर भेट घेत चौकेकर यांनी ब्रॉंझ धातूची श्रीगणेशमूर्ती भेट दिली. यावेळी प्रशांत गावडे यांच्यासह प्राणजीवन सहयोग संस्थेचे सदस्य उपस्थित होते.
पालकमंत्री नितेश राणेंचे वाढदिनी संदीप चौकेकर यांच्याकडून अभिष्टचिंतन











