मंत्री भारत गोगावलेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा निषेध

राणे साहेबांबद्दल अपशब्द कदापि सहन करणार नाही

पडेल मंडल तालुकाध्यक्ष बंड्या नारकर यांचा इशारा

देवगड (प्रतिनिधी) : पक्ष वाढीसाठी मेळावे घेणारे मंत्री भरत गोगावले यांनी शनिवारी कुडाळ येथे झालेल्या मेळाव्यात नारायण राणेंविषयी जे वक्तव्य केले ते निषेधार्ह आहे. प्रसिद्धीसाठी काहीही वक्तव्य करून राणे साहेबांविषयी अपशब्द वापरायची मंत्री भरत गोगावले यांची हिंमतच कशी होते? राणे साहेबांची प्रतिमा मालिन करायचा प्रयत्न भरत गोगावले यांनी केला असून त्याचा आम्ही निषेध करतो. सिंधुदुर्गात येऊन जर तुम्ही राणे साहेबांविषयी अपशब्द वापरत असाल आणि त्यांना बदनाम करायचा प्रयत्न करत असाल तर तो आम्ही कदापि सहन करणार नाही, असा इशारा भाजपा पडेल मंडल तालुकाध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर यांनी दिला आहे. खासदार नारायण राणे हे महायुतीमधील एक महत्त्वाचे नेते असून राज्याचे मुख्यमंत्री तसेच केंद्रातील मंत्रिपदही त्यांनी सांभाळले आहे. गोगावलेंच्या या वक्तव्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडू शकतो, याची जाणीव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोगावले यांना करून देऊन त्यांना योग्य ती समज द्यावी, असेही बंड्या नारकर यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!