कणकवली (प्रतिनिधी) : विद्यामंदिर हायस्कूल लोरे-वाघेरी येथे कॉज टू कनेक्ट फाउंडेशन पुणे च्या वतीने लोरे – वाघेरी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, विद्यामंदिर हायस्कूल लोरे-वाघेरी येथे Wheels of Skills बस च्या माध्यमातून बहुविध कौशल्य अभ्यासक्रम (Multi Skill Foundation Course) ची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन ने सुरुवात करण्यात आली.याक्षणी कॉज टू कनेक्ट फाउंडेशनचे सर्व प्रतिनिधी, लोरे-वाघेरी हायस्कूल संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी “लोरे-वाघेरी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ,लोरे-वाघेरी या संस्थेचे संस्थाध्यक्ष श्री. तुळशीदास रावराणे, विद्यामंदिर हायस्कूल लोरे वाघेरी चे मुख्याध्यापक एस.व्ही. देसाई, पी.एल.साटम, श्री गोसावी,श्री वसावे उपस्थित होते.
श्री देसाई यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हटले की, “विद्यार्थ्यांचा चौकस दृष्टिकोन असावा, विद्यार्थ्यांना नवीन प्रात्यक्षिक शिकायला आवडेल त्यासाठी आमचं देखील पूर्ण सहकार्य असेल.”हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र wheels of Skills च्या माध्यमातून कौशल्याची गंगा लाभली आहे. याचा शाळा, विद्यार्थी व पालक यांनी फायदा करून घेणे गरजेचे आहे.” श्री गोसावी यांनी बहुविध कौशल्य अभ्यासक्रम शाळेत उपलब्ध करून दिल्याबद्दल कॉज टू कनेक्ट फाउंडेशन पुणे, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान आणि डॉ मिलिंद कुलकर्णी यांचे आभार मानले.
प्रकल्प समन्वयक सिंधुदुर्ग सुचित भोगले यांनी बहुविध कौशल्य अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती सांगून विद्यार्थी व उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.कमलेश बिडये व विक्की कासले यांनी उपस्थितांना wheels of Skills बस जवळ चारही विभागांची माहिती देऊन विडिओ स्वरुपात अभ्यासक्रमाची ओळख करून दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम विषयक सुचना देऊन गृप तयार करण्यात आले.













