अतुल रावराणे यांनी अतुल जाधव यांची सदिच्छा भेट घेत दिल्या शुभेच्छा

कणकवली (प्रतिनिधी) : श्री भैरभवानी प्रतिष्ठान चे अध्यक्ष तथा शिवसेना उबाठा सिंधुदुर्ग चे माजी नेते अतुल रावराणे यांनी कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांची सदिच्छा भेट घेत शुभेच्छा दिल्या. पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी अलीकडेच कणकवली पोलीस ठाणे प्रभारी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. अतुल जाधव यांनी यापूर्वी वैभववाडी पोलीस ठाणे प्रभारीपदी यशस्वीपणे कार्यभार सांभाळला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखतानाच जनतेशी सौहार्द संबंध आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांशीही त्यांनी चांगला संपर्क ठेवला होता. वैभववाडी प्रमाणेच कणकवली तालुका पोलीस ठाणे प्रभारीपदी जाधव यांची कारकीर्द यशस्वी व्हावी अशा सदिच्छा अतुल रावराणे यांनी दिल्या.

error: Content is protected !!