वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरातील पीएम श्री श्री दत्त विद्यामंदिर वैभववाडी येथे मुख्याध्यापक, विद्यार्थी पालक यांची सभा पार पडली, सभेत तेजस साळुंखे यांची शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी व सुषमा दळवी यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली,तर सचिवपदी मुख्याध्यापक दिनकर केळकर यांची नियुक्ती करण्यात आली, तसेच शालेय व्यवस्थापन समिती मध्ये सर्व समाज घटकातील विद्यार्थी पालक म्हणून सदस्य नेमण्यात आले, तर नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांचा सत्कार शालेय व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष, पत्रकार संजय शेळके यांच्या उपस्थितीत पार पडला. या निवडी बद्दल परिसरातिल सर्व शिक्षण प्रेमींनी नवनिर्वाचित शालेय व्यवस्थापन समितीचे अभिनंदन केले आहे. नविन शैक्षणिक वर्षात शिक्षक पालक व विद्यार्थी यांच्या समन्वयातून विविध शैक्षणिक उपक्रम, कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे नुतन अध्यक्ष तेजस साळुंखे यांनी सांगितले. तेजस साळुंखे सध्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेत अशासकीय सदस्य व वैभववाडी तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे नुतन अध्यक्ष तेजस साळुंखे, उपाध्यक्ष सुषमा दळवी, माजी अध्यक्ष पत्रकार संजय शेळके, मुख्याध्यापक तथा सचिव दिनकर केळकर, शिक्षिका मनीषा साठे, अविनाश औटे, शीतल पाटील, गौतमी कळसुलकर, मानसी साखरपेकर, प्राची सावंत, भक्ती काळे, समिधा शिंदे, विश्वास जंगम, प्रकाशसिंह राजपूत, राजू जाधव, नंदकुमार हुले, स्वप्नाली लांबोरे, गौरी निकम, विद्या बोडेकर, शोभा सातपुते, शितल टकले, नयन पवार, पूजा काळे, प्रियंका केंद्रे, शालन लसणे, सोनल जाधव बहुसंख्य पालक उपस्थित होते.











