खारेपाटण(प्रतिनिधी): खारेपाटण गावच्या रहिवासी असलेल्या व भारतीय रिझर्व बँकेच्या सेवेतून मूंबई येथून नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या सौ सुजाता संजय देसाई यांची रत्नागिरी जिल्ह्यातील दि राजापूर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या तज्ञ संचालक पदी नुकतीच निवड झाली असून त्यांच्या या निवडीबद्दल खारेपाटण येथील प.पू. भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खारेपाटण यांच्या वतीने त्यांचा नुकताच शाल, पुषपगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पतसंस्थेचे व्हाइस चेअरमन श्री राजेंद्र ब्रम्हदंडे,संचालक श्री संतोष पाटणकर,संचालिका सौ श्रद्धा देसाई,संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शुभम मोरे,सचिव श्री सत्यवान खांडेकर,संस्थेचे कर्मचारी श्री विवेक ब्रम्हदंडे,श्री संजय देसाई आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण या शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष श्री संजय देसाई यांच्या सौ सुजाता देसाई या पत्नी होत. राजापूर अर्बन बँकेच्या तज्ञ संचालक पदी सौ सुजाता देसाई यांची निवड झाल्याबद्दल खारेपाटण पंचक्रोशीतील विविध सामाजिक संस्थांच्या वतीने व मान्यवर यांच्या वतीने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.