माधवबागच्या वतीने 13 ते 18 एप्रिल या कालावधीत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

ब्लॉकेजेस, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, हृदयाची कमी कार्यक्षमता अशा रुग्णांसाठी उपयुक्त

कणकवली (प्रतिनिधी) : माधवबागच्या वतीने दिनांक १३ ते १८ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० ते सायं. ६ या कालावधीत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ही तपासणी ब्लॉकेजेस, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, हृदयाची कार्यक्षमता कमी होणे अशा रुग्णांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या शिबिरामध्ये हृदय तपासणी, हृदयाचे ठोके तपासणी, रक्तदाब, रक्तातील ऑक्सिजन प्रमाण तपासणी, इ.सी.जी. TMT test, रँडम शुगर (हृदयाची व्यायाम कार्यक्षमता तपासणी) याशिवाय तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. तेव्हा जास्तीत जास्त हृदयरोगी रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन माधवबागच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!