शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त ओसरगाव येथे मुलांना खाऊ वाटप

माजी उपसरपंच बबली राणे यांनी केले खाऊ वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा आज वाढदिवस. दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा, आरोग्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रात विधायक कार्यक्रमांचे आयोजन करून संदेश पारकर आपला वाढदिवस उपक्रमशीलतेने साजरा करतात. यावर्षीही सामाजिक बांधिलकी जपत संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त ओसरगाव येथे मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. ओसरगाव माजी उपसरपंच बबली राणे यांच्या वतीने ओसरगाव तलाव येथील जिल्हा परिषद शाळा नंबर १ तसेच ओसरगाव टोलनाक्याजवल राहणाऱ्या मध्यप्रदेश येथील कामगारांच्या मुलांना हे फरसाण आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले.

यावर्षीचा संदेश पारकर यांचा वाढदिवस अत्यंत भावनिक ठरला. कारण काही दिवसांपूर्वीच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्यावर दुःखद प्रसंग ओढवला आहे. अशावेळी मित्रत्वाचे नाते जपत ओसरगाव उपसरपंच बबली राणे यांनी सामाजिक कार्यातून संदेश पारकर यांचा वाढदिवस साजरा करत मुलांना खाऊचे वाटप केले. ओसरगाव तलाव जिल्हा परिषद शाळा नंबर १ येथील तसेच ओसरगाव टोल नाका परिसरातील मध्य प्रदेशातून कामानिमित्त स्थलांतरित झालेल्या कामगारांच्या मुलांना हे खाऊ वाटप करण्यात आले. वाढदिवस म्हणजे केवळ सेलिब्रेशन नव्हे, तर सेवा आणि सद्भावनाही असू शकते, हेच यातून अधोरेखित होते.

error: Content is protected !!