वैभववाडीत शिक्षक समितीतर्फे आयोजित रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा वैभववाडीच्या ६३ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामीण रुग्णालय, वैभववाडी येथे झालेल्या या शिबिरात शिक्षक, स्थानिक नागरिक, तसेच युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शिबीराचे उद्घाटन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अर्जुन नरोटे, शिक्षक नेते सुनील चव्हाण व शिक्षक नेते संजय पाताडे यांच्या हस्ते झाले. यावेळी पतपेढी संचालक संतोष मोरे, शिक्षक नेते सुरेंद्र साळुंखे, जिल्हा प्रवक्ते सुधीर गोसावी, जिल्हा प्रतिनिधी स्वप्निल भोसले, चंद्रकांत जाधव, रफिक बोबडे, सोनाली केरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच सिंधू रक्तमित्र संघटनेचे तालुकाध्यक्ष राजू पडवळ व सचिव मंदार चोरगे उपस्थित होते. शिबीरस्थळी शिक्षण विस्तार अधिकारी रुचिता कदम, पदवीधर व केंद्रप्रमुख शिक्षक संघटनेचे संतोष गोसावी यांनी सदिच्छा भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. “रक्तदान हे जीवनदान आहे. समाजाप्रति आपली जबाबदारी ओळखून शिक्षक समितीने सामाजिक भान जपल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

यावेळी शिक्षकांबरोबरच संतोष कुडतरकर,सिद्‌धेश कुडाळकर, विवेक नर, अक्षय पवार, योगेश पवार, अभिषेक सरवणकर आदी युवकांनीही उत्स्फूर्त रक्तदान केले.रक्तदानानंतर सर्व रक्तदात्यांना रक्तपेढीच्या वतीने प्रमाणपत्र व शिक्षक समितीच्या वतीने आभारपत्र देऊन गौरविण्यात आले. सहभागी शिक्षकांना आणि स्वयंसेवकांना शिक्षक समितीच्यावतीने विशेष धन्यवाद देण्यात आले. दि. २१ व २२ जुलै रोजी उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे रुग्णांना फळवाटप केले जाणार आहे. भविष्यातही अशा समाजहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे आयोजकांनी सांगितले. यावेळी अध्यक्ष विवेकानंद कडू, सचिव प्रफुल्ल जाधव, कार्याध्यक्ष संतोष भरडकर, महिला सेल सचिव वेलांकणी गुरव, महादेव शेट्ये, सारिका उरणे, शिवराज करले, किशोर पेडणेकर,विनोद करपे, अनिल नारकर, अनिल खांबल, सुहास रावराणे, विकास नर, जयवंत मोरे, गजानन टक्के, अक्षय गराठे, प्रीती जाधव, संतोष माने, अनंत चव्हाण, गजानन अडुळकर, संजय नारकर, अंबादास चेमटे, ज्ञानेश्वर महाले, अंकुश सुतार, हनुमंत सुतार, स्वप्नील गुरखे आदी समिती पाईक उपस्थित होते.

error: Content is protected !!