अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे कणकवलीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली कॉलेज कणकवली येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सिंधुदुर्गच्या वतीने दहावी उत्तीर्ण व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सदरील कार्यक्रम ओजस जयवंत रत्नागिरी विभाग संघटन मंत्री व मिलिंद गोळसे जिल्हाप्रमुख सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी कणकवली कॉलेज कणकवलीचे प्राचार्य युवराज महालिंगे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. तसेच सिंधुदुर्ग संघटन मंत्री विनीत परब, कणकवली अभावीपचे शहराध्यक्ष प्राध्यापक डॉ.सुरेश हुसे, शहर उपाध्यक्ष डॉ. रामदास बोलके, शहर मंत्री सौरभ राणे, कणकवली कॉलेजचे प्राध्यापक महादेव माने अभावीपचे दिग्विजय पवार हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून संकेत देवस्थळे हे उपस्थित होते आणि त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. अभावीप सिंधुदुर्ग तर्फे जवळपास 100 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख वक्ते संकेत देवस्थळे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना शाळेत तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अभावीपच महत्व काय असतं याचं सखोलपणे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर मंत्री सौरभ राणे यांनी तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा परिचय विनीत परब व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी मिस्त्री व कार्यक्रमाचे आभार शेजल गोठणकर यांनी केले.

error: Content is protected !!